प्रेरणादायी बोधकथा
मित्रांनो, दोन भाऊ असतात... एक भाऊ हा शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असतो, तो बिजनेस करत असतो... संपूर्ण शहरात त्याची खूप ओळख असते, इज्जत असते... लोकं त्याच्या कामाबद्दल खूप प्रशंसा करत असतात.. तर दुसरा भाऊ हा नेहमी दारू पिऊन कुठे तरी पडलेला असतो... त्याला वाईट सवयी लागलेल्या असतात.... 👉 शहरातील लोकं विचार करतात, दोन्ही भावाचे आई वडील एकच आहे, मग एक मुलगा श्रीमंत आहे, तर दुसरा मुलगा आशा वाईट परिस्थिती मध्ये का गेला असेल....या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी लोकं दोन्ही भावाकडे जातात.... सर्वात आधी लोकं लहान भावाकडे जातात.... लहान भावाला प्रश्न विचारतात, तुम्ही असे का झाले आहात...??? तुम्हाला वाईट सवयी का आहेत...??? तुम्ही दारू पिऊन धिगाणा करता... यामागे काय कारण आहे...??? तेंव्हा लहान भाऊ म्हणतो, माझे वडील आम्ही लहान असताना माझे वडील रोज दारू पिऊन यायचे आणि मला व माझ्या आईला मारायचे....आम्हाला शिव्या द्यायचे... त्यांच्या वाईट वागण्यामुळे मला पण तशीच वाईट सवय लागली आणि मी दारू प्यायला लागलो....घरात वाईट वातावरण असल्यामुळे मी असा बनलो... *आता शहरातील लोकं, दुसऱ्या भावाकडे ...