प्रेरणादायी बोधकथा
![]() |
मित्रांनो, दोन भाऊ असतात... एक भाऊ हा शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असतो, तो बिजनेस करत असतो... संपूर्ण शहरात त्याची खूप ओळख असते, इज्जत असते... लोकं त्याच्या कामाबद्दल खूप प्रशंसा करत असतात.. |
तर
दुसरा भाऊ हा नेहमी दारू पिऊन कुठे तरी पडलेला असतो... त्याला वाईट सवयी लागलेल्या असतात....
👉 शहरातील लोकं विचार करतात, दोन्ही भावाचे आई वडील एकच आहे, मग एक मुलगा श्रीमंत आहे, तर दुसरा मुलगा आशा वाईट परिस्थिती मध्ये का गेला असेल....या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी लोकं दोन्ही भावाकडे जातात....
सर्वात आधी लोकं लहान भावाकडे जातात....
लहान भावाला प्रश्न विचारतात, तुम्ही असे का झाले आहात...???
तुम्हाला वाईट सवयी का आहेत...???
तुम्ही दारू पिऊन धिगाणा करता... यामागे काय कारण आहे...???
तेंव्हा लहान भाऊ म्हणतो, माझे वडील
आम्ही लहान असताना माझे वडील रोज दारू पिऊन यायचे आणि मला व माझ्या आईला मारायचे....आम्हाला शिव्या द्यायचे...
त्यांच्या वाईट वागण्यामुळे मला पण तशीच वाईट सवय लागली आणि मी दारू प्यायला लागलो....घरात वाईट वातावरण असल्यामुळे मी असा बनलो...
*आता शहरातील लोकं, दुसऱ्या भावाकडे जातात....*
दुसरा भाऊ हा बिजनेस मॅन असतो, मोठा श्रीमंत असतो...
👉 लोकं दुसऱ्या भावाला विचारतात, तुम्ही श्रीमंत आहात, शहरात तुमची खूप इज्जत आहे त्यामागे काय रहस्य आहे...??
तेंव्हा मोठा भाऊ म्हणतो...आज मी जे काही आहे त्यामागे *माझे वडील* आहेत....
👉 आम्ही लहान असताना माझे वडील रोज दारू पिऊन घरी यायचे आणि आम्हाला मारायचे...
मला वडिलांचे वागणे अजिबात आवडायचे नाही... मी लहान असताना ठरवलं होतं... मी मोठा होऊन चांगला व्यक्ती बनेल, श्रीमंत बनेल.... चांगले जीवन जगेल....
मित्रांनो, दोन्ही भावाचे उत्तरे ऐकून सर्व लोकं आश्चर्यचकित होतात...
👉 मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य असे की, तुमच्यासोबत जे काही वाईट घडलं असेल त्या घडलेल्या घटनेबद्दल तुम्ही कोणत्या गोष्टीचा स्वीकार करता...हे फार महत्वाच असते...
आपल्यासोबत जे काही घडते त्याला नेहमी दोन बाजु असतात... *सकरात्मक आणि नकरात्मक*
👉 एखाद्या वाईट घटनेला तुम्ही सकरात्मक दृष्टीकोणाने स्वीकार करत असाल तर तुम्ही निश्चितच जीवनात चांगल काही करू शकता...परंतु...वाईट घटनेला तुम्ही नकरात्मक दृष्टीकोणाने स्वीकार करत असाल तर आता तुम्ही जेथे आहात तेथेच तुम्ही पडुन राहालं....
👉 त्यामुळे, वाईट परिस्थितीमध्ये किंवा वाईट घडलेल्या घटनेमध्ये पॉजिटीव्ह गोष्टीकडेच लक्ष ठेवा...निगेटिव्ह गोष्टीचा स्वीकार करू नका...मी चांगल काय करू शकतो... याचा विचार करत रहा....जीवन घडवायचं की बरबाद करायच.. दोन्ही गोष्टी तुमच्या हातात असतात...
मित्रांनो, आजचा हा छोटासा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या...असेच प्रेरणादायी लेख तुम्हाला वाचायचे असतील तर माझा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा...
मित्रांनो, अभ्यासा संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हाट्सअपला msg करून तुम्ही तुमचे प्रश्न नक्की विचारू शकता....👍🏻
धन्यवाद... 🙏🏻🌹😇
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697



.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thank You... 🙏🏻🌹