प्रेरणादायी बोधकथा:- आपण नेहमी योग्य असु शकत नाही...
You are not always right...
मित्रांनो, पावसाचे दिवस सुरु होत असतात. एक चिमणी घरटं बांधण्यासाठी झाड शोधत असते... 🕊उडत असताना चिमणीला नदी काठी दोन झाडे दिसतात...🌳🌳
👉 चिमणी पहिल्या झाडाकडे जाते झाडाला विचारते, झाडा मी तुझ्या फांदीवर घरटे बांधून थोड्या दिवसाकरीता राहिले तर चालेल का?
*पहिले झाड म्हणते अजिबात चालणार नाही...*
चिमणी दुःखी होऊन दुसऱ्या झाडाकडे जाते दुसऱ्या झाडाला विचारते, झाडा मी तुझ्या फांदीवर घरट बांधून राहिले तर चालेल का??
*दुसरं झाड लगेच चिमणीला परवानगी देते...*
चिमणी खुश होते...
झाडाच्या एका मजबूत फांदीवर छोटंसं सुंदर घरटं बांधते, घरट्यात अंडे देते, त्या अंड्यामधुन पिल्ले येतात...
*चिमणी आणि तिचे लहानसे पिल्ले त्या घरट्यात राहु लागतात...*
👉 काही दिवसानंतर खूप जोराचा पाऊस पडतो...
नदीला खतरनाक पूर येतो, त्या पूरामुळे नदीकाठी असलेले पहिले झाड खाली कोसळते आणि नदीच्या पाण्यासोबत वाहुन जाते...
झाड वाहुन जात असताना चिमणी त्या झाडाला म्हणते...
बघ तु मला तुझ्या फांदयावर राहायला दिले नाही ना म्हणून तुझी अशी अवस्था झाली आहे...
यावर वाहुन जाणारे झाड हसत चिमणीला म्हणते...
चिमणी तुला माझा राग आला असेल परंतु मला माहिती होते माझे मुळे जमीनीच्या जास्त जास्त खोल पर्यंत नाही...
मी नदीचा एक पूर पण सहन करू शकणार नाही... जास्त पाऊस पडल्यावर मी पडेल वाहुन जाईल हे मला आधीच माहिती होते.
👉 तुला होकार दिला असता तर, आज तु आणि तुझे पिल्ले सर्वजन माझ्यासोबत नदीच्या पाण्यात वाहुन गेले असतो...आपल्या सर्वांचा मृत्यू झाला असता....
म्हणून मी तुला माझ्या फांदयावर घरटं करून राहायला नकार दिला होता...🙏
झाडाचे बोलणे ऐकून चिमणीला रडायला येते...
चिमणी मनातल्या मनात विचार करते की मी त्या झाडाबद्दल किती वाईट विचार करत होते ते झाड तर माझ्या फायद्यासाठी मला नकार दिला होता...
चिमणी त्या वाहुन जाणाऱ्या झाडाला धन्यवाद म्हणते...🙏
👉 मित्रांनो, गोष्टीचे तात्पर्य असे आहे की, आपण समोरच्या व्यक्तीबद्दल जसा विचार करतो तो विचार योग्यच असेल असं होत नाही...
आपण नेहमी योग्य असु शकत नाही...
मित्रांनो, आपण एखाद्या व्यक्तीकडुन खूप अपेक्षा ठेवतो, कठीण काळात तो व्यक्ती आपल्याला मदत करेल असं आपल्याला वाटतं परंतु वेळेवर तो व्यक्ती आपली मदत करत नाही...
👉 आशावेळी आपण त्या व्यक्तीला दोष देतो, त्याला नको ते बोलतो... परंतु आपण कधीच त्या व्यक्तीबद्दल चांगला विचार करत नाही अथवा त्या व्यक्तीला समजुन घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही...
होऊ शकते समोरचा व्यक्ती एखाद्या अडचणीत असेल म्हणून त्याने आपल्याला मदत केली नसेल...
आपण एखाद्या मित्राला कॉल करतो किंवा व्हाट्सअप msg करतो... त्यावेळी मित्र आपल्याला रिप्लाय देत नाही...
मित्र कॉल उचलत नाही किंवा रिप्लाय देत नाही म्हणून आपण मित्रांबद्दल निगेटिव्ह विचार करणं सुरु करतो...🤦🏻♂️
मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही समोरच्या व्यक्तीबद्दल जसा विचार करता...तो विचार योग्य असेलच असं नाही...
आपण नेहमी योग्य राहु शकत नाही... त्यामुळे जेंव्हा पण कोणत्याही व्यक्तीला कॉल कराल किंवा msg कराल... तेंव्हा पॉजिटीव्ह दृष्टीकोण ठेवा आणि थोडासा संयम बाळगा, मित्रांबद्दल लगेच निगेटिव्ह विचार डोक्यात आणु नका...पॉजिटीव्ह साईडने विचार करा...
मित्रांनो, आजची प्रेरणादायी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर, नक्की फीडबॅक द्या...
धन्यवाद...🙏🌹😇
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thank You... 🙏🏻🌹