अपयशी लोकांची कारणे

अपयशी लोकांची कारणे...

मित्रांनो, माणुस असा प्राणी आहे, जो एखाद्या कामात यशस्वी झाला तर सर्व श्रेय स्वतः घेतो... आणि चुकून अपयशी झाला तर सर्व दोष दुसऱ्यावर टाकतो...😄

अपयशी झाल्यावर प्रत्येक व्यक्ती काही ना काही कारणे नक्की देतो...
जसे की,
1) एखाद्या व्यक्तीला जर बिजनेसमध्ये लॉस झाला असेल तर, तो सर्व दोष ऑफिस स्टाफवर ढकलतो...

2) एखादा विद्यार्थी एखाद्या परीक्षामध्ये नापास झाला असेल तर, तो सर्व दोष शिक्षकांना देतो...

3) एखादा व्यक्ती त्याच्या जीवनात अपयशी झाला असेल तर तो जीवनाला दोष देतो - जीवन खुप अवघड आहे वैगरे वैगरे

4 ) काही लोकं घरच्या परिस्थितीना दोष देतात जसे की माझ्या घरचे गरीब आहेत, त्यामुळे मी यशस्वी झालो नाही 

5) काही लोकं पैशांना दोष देतात...माझे स्वप्न खुप मोठे होते ते पूर्ण झाले नाही कारण माझ्याकडे पैसे नव्हते, पैसे नसल्यामुळे मी अपयशी झालो...

6 ) आम्ही जिथे राहतो त्या कॉलनीमधील परिसरामधील राहणारे लोक चांगले नाही त्यामुळे मी माझे स्वप्न पुर्ण करू शकलो नाही...

7) काही लोकं नशीबाला दोष देतात...श्रीमंत व्हायला पण नशीब लागते आणि मी नशीबवान नाही...

8) श्रीमंत झालेल्या लोकांनी नक्की कोणाला लुटलं असेल म्हणून ते श्रीमंत झाले असेल...

9) मला माझे जीवन बदलायचे परंतु कसे बदलु, माझ्याजवळ पैसे नाही, जागा नाही, काहीच नाही...वेळ नाही...

10) जग खूप वाईट आहे, लोकं धोका देतात...वैगरे वैगरे

👉 मित्रांनो, माझ्या वोर्कशॉप मध्ये जे विद्यार्थी, जे माणसं सहभाग घेतात त्यांना त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या ध्येयाबद्दल विचारले तर त्यांचे सुद्धा असेच वेगवेगळे उत्तर येतात... 🤷‍♂️

मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती भूतकाळात झालेल्या घटनाना दोष देत असतो... आई बाबा असतील किंवा शाळेतले शिक्षक यांना सुद्धा खुप लोक दोष देत राहतात...

मित्रांनो, यशस्वी झालेल्या लोकांचे काही उदाहरणे पाहुयात
1) थॉमस एडीसन जेंव्हा शाळेत होते तेंव्हा ते मंद बुद्धीचे होते त्यामुळे शिक्षकानी त्यांना शाळेमधुन हाकलून दिले होते...

2) भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब लहानपणी चहा विकत होते...

3) अमेरिकेचे माजी प्रधानमंत्री बराक ओबामा सर सुद्धा लहानपणी गरीब होते... त्यांचे आई वडील सुद्धा गरीब होते...

4) स्टीफन विल्यम हॉकिंग सर  हे तर अपंग होते तरी सुद्धा त्यांनी खुप छान पुस्तके लिहीले...

5) क्रिस गेल ( क्रिकेटर ) जेंव्हा लहान होते तेंव्हा ते कचरा प्लास्टिक बॉटल जमा करुन भंगार जमा करुन ते विकायचे पैसे जमा करायचे... त्यांचे आई वडील सुद्धा खूप गरीब होते...

मित्रांनो, या जगात यशस्वी लोकांचे असे हजारो लाखो उदाहरणं आहेत...ज्यांनी आपली वाईट परिस्थिती स्वतःच्या मेहनतीने आणि स्वतःच्या विचाराने बदली आहे...

👉 मित्रांनो, ही झाली त्या यशस्वी लोकांची कहाणी, ज्यांनी स्वतःची वाईट परिस्थिती बदली आहे...

परंतु

महत्वाचा प्रश्न हा आहे कि, तुम्ही तुमची परिस्थिती कशी बदलणार आहात....??? तुम्ही आता काय करणार आहात...??

*तुमची आताची जी परिस्थिती आहे, त्याच परिस्थितीमध्ये तुम्ही जीवन जगणार आहात कि तुम्ही तुमची परिस्थिती बदलणार आहात...??* 🤷‍♂️


मित्रांनो, एकमेकांना दोष देऊन अथवा काही कारणे सांगुन तुम्ही तुमची आजची परिस्थिती बदलू शकत नाही....त्यामुळे सर्वात आधी कारणे देणे बंद करा...🙏🏻

👉 मित्रांनो, तुम्हाला वाटतं असेल की जगामध्ये मला एकट्यालाच प्रॉब्लेम येतात बाकीच्यांना प्रॉब्लेम येत नाही... असा विचार तुम्ही करत असाल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात...

जगात जेवढे पण यशस्वी लोकं आहेत त्यांची Biography तुम्ही वाचली तर तुमच्या लक्षात येईल त्या लोकांना पण तसाच प्रॉब्लेम होता जसा आज तुम्हाला आहे...त्यामुळे तुम्ही काही जगा वेगळे नाही आहात...प्रॉब्लेम प्रत्यकाच्या जीवनात असतात.

मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा... तुम्ही तुमचे जीवन नक्की बदलू शकता...

👉 मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक फॅमिली मध्ये असा एक तरी व्यक्ती असतो, ज्याच्यामध्ये सर्वांचे जीवन बदलण्याची ताकद असते.... *तुमच्या परिवारासाठी तुम्ही ती व्यक्ती असु शकता...*

मित्रांनो, स्वतःचे स्वप्न पुर्ण होण्यासाठी आणि  स्वतःचे जीवन बदलण्यासाठी तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो...

👉 सर्वात प्रथम एक कोरा कागद घ्या आणि त्यावर तुमच्यामध्ये असलेल्या कमी लिहा... तुम्ही कोणत्या गोष्टीला भिता ते लिहा, तुमच्या जीवनात असणाऱ्या प्रॉब्लेम लिहा... नंतर त्या कागदाला गोळा मोळा करा आणि कचऱ्याच्या पेटीत टाकुन द्या....

आता दुसऱ्या कागदावर तुमचे स्वप्न लिहा, तुमचे goal लिहा.... तुम्हाला तुमचे जीवन कसे जगायचे आहे ते लिहा...


जीवनात तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत ते सुद्धा लिहा... नंतर डोळे बंद करा आणि असं फील करा की ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत... नंतर डोळे उघडा आणि तुमच्या रोजच्या कामाला लागा...हेच प्रोसेस सकाळी संध्याकाळी करत रहा...

रोज रात्री झोपायच्या अगोदर तुमचे Goal कागदावर लिहा, लिहिलेले Goal पुन्हा पुन्हा वाचा  आणि नंत्तर झोपा...

तुमचे जे स्वप्न आहे त्यावर Focus ठेवा...

👉 फोकस ठेवण्यासाठी अजुन एक सोपा उपाय सांगतो... तुमचे जे स्वप्न आहेत ते दोन तीन कागदावर लिहा आणि तो कागद तुमच्या रूममध्ये वेगवेगळ्या जागी लावा...

याचा फायदा असा होईल कि जेंव्हा पण तुम्ही तुमच्या रूममध्ये जाल तेंव्हा तुमची नजर तुम्ही चिटकवलेल्या कागदावर पडेल... तेंव्हा तुम्हाला समजेल हेच माझं स्वप्न आहे, आणि तुम्हाला तुमचे स्वप्न आठवतील आणि तुम्ही परत तुमच्या ध्येयानुसार कामाला लागाल...अभ्यास कराल...

👉 मित्रांनो, तुमचे जे ध्येय आहे, ते सरासरी कोणाला सांगु नका..परंतु तुमच्या विश्वासु मित्राला, जो तुम्हाला नेहमी Motivate करेल आशा मित्राला तुमचे ध्येय नक्की सांगा...❤

रोज रात्री झोपण्याआधी संपूर्ण दिवसाचे सिंहावलोकन करा...रोज रात्री झोपण्याआधी तुमचे ध्येय कागदावर लिहा आणि ते पुन्हा पुन्हा वाचा...

तुम्हाला जर करोडपती व्हायचं असेल तर, मी करोडपती होऊ शकतो या विचारावर विश्वास ठेवा...

👉 जेंव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या बाबतीत सिरीयस असता तेंव्हा तुम्हाला तुमच्या स्वप्नाप्रयत्न पोहचण्यासाठी हजारो मार्ग मिळतील त्यामधला तुम्हाला आवडेल तो मार्ग निवडा आणि मेहनत करत रहा.... लवकरच तुम्हाला यश मिळेल, लवकरच तुम्ही यशस्वी व्हाल...👍

मित्रांनो, आजचा लेख दोन तीन वेळ वाचा आणि लेखात सांगितल्याप्रमाणे सराव करा... जीवनात तुम्हाला छान परिणाम मिळेल...

मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या... तुम्ही व्हाट्सअपला msg करुन सुद्धा तुमची प्रतिक्रिया देऊ शकता....

धन्यवाद... 🙏🌹😇

✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रागावर नियंत्रण कसे ठेवावे..??

प्रेरणादायी बोधकथा:- आपण नेहमी योग्य असु शकत नाही...