रागावर नियंत्रण कसे ठेवावे..??

 रागावर नियंत्रण कसे ठेवावे...??


👉 मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात मानवी जीवन खुप व्यस्त झाले आहे...एखादे काम पूर्ण झाले तर आपल्याला आनंद होतो परंतु  एखादी गोष्ट आपल्या इच्छानुसार पूर्ण झाली नाही तर आपल्याला राग येतो... 

👉  एखाद्या वेळेस राग आला तर काही हरकत नाही परंतु तुम्ही जर रोज रोज रागवत असाल तर ही सवय तुमच्यासाठी चांगली नाही... 

मित्रांनो, मी असे खूप लोकं पाहिले जे प्रत्येक वेळेस रागावलेली असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये रागवतात...

आपण जर त्यांना एखादा साधा प्रश्न विचारला तरी सुद्धा ते रागवतात... 

काही लोक त्यांच्या जीवनात खूप  सिरीयस असतात. 24 तास सिरीयस असतात.

असे लोक स्वतः हसत नाही आणि दुसऱ्याला पण हसु देत नाही. 😄

असे सिरीयस राहणारे, रागवणारे लोकं त्यांच्या जीवनात नेहमी  एकटे राहतात कारण अशा *रागवणाऱ्या किंवा सिरीयस राहणाऱ्या लोकांसी कोणीच मैत्री करत नाही...*

मित्रांनो, राग दोन मिनिटासाठी येतो परंतु हा दोन मिनिटाचा राग माणसाचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करू शकतो.

👉 मित्रांनो, तुम्हाला सुद्धा प्रत्येक वेळी राग येत असेल... किंवा तुम्हाला रागवण्याची सवय झाली असेल तर ती सवय सोडुन देण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे...त्या अगोदर आपण पाहणार कि राग आल्याने कोण कोणते परिणाम होतात... 

रागाचे दुष्परिणाम...

1) आपल्या रागामुळे आपले जवळचे मित्र दुर जातात... 

2) नातेसंबंध खराब होतात... 

3) रागावणारा व्यक्ती हमेशा दुःखी असतो... 

4) रोज रोज रागवण्याच्या सवयीमुळे डिप्रेशन, ब्लड प्रेशर वाढते.... 

5) रागाच्या सवयीमुळे त्या व्यक्तीच्या जीवनातून आनंद, ख़ुशी प्रेम या साऱ्या गोष्टी  कायमच्या निघुन जातात...

6) राग कंट्रोल झाला नाही तर हातापायी होते...जैल होऊ शकते...

मित्रांनो, रागामुळे स्वतःचे नुकसान तर होतेच होते परंतु आपल्या रागामुळे  दुसऱ्याचे सुद्धा खुप नुकसान होत असते... 

रागामध्ये आपण समोरच्या व्यक्तीला काही ही बोलतो... अपशब्द बोलण्याने समोरच्या व्यक्तीचं मन दुखते त्याच्या मनात आपल्या बद्दल वाईट भावना निर्माण होतात... 

मित्रांनो, स्वतःचा राग कसा नियंत्रण करावा याबद्दल मी तुम्हाला काही टिप्स देत आहे... त्या टिप्स वाचा आणि त्या टिप्स स्वतःच्या जीवनात लागु करा... 

1) स्वतःची चुक आहे का...? ते पहा

👉 मित्रांनो, खुप वेळा असं होते कि एखाद्या गोष्टी मध्ये आपल्या स्वतःचीच  चुक असते आणि आपण समोरच्या व्यक्तीला दोष देत असतो... 

जेंव्हा आपण रागात असतो तेंव्हा समोरच्या व्यक्तीला खुप काही बोलुन जातो आणि नंतर आपल्या लक्षात येते कि, खरी चुक तर आपलीच होती...🙆‍♂️

मित्रांनो, जेंव्हापण तुम्हाला राग येईल तेंव्हा सर्वात प्रथम पाहा  चुक समोरच्या व्यक्तीची आहे कि आपल्या स्वतःची चुक आहे... 

जेंव्हा तुम्हाला समजेल चुक स्वतःची आहे... तेंव्हा तुम्हाला राग अजिबात येणार नाही... 👍

2) बोलण्या आधी विचार करा...

👉 मित्रांनो, माणुस रागारागात खुप वाईट बोलतो परंतु आता पासुन बोलताना विचार करून बोलण्याची सवय स्वतःला लावा... 

वाईट बोलण्याने नातेसंबंध खराब होतात त्यामुळे वाईट भाषा सोडुन द्या... 

प्रेमाची भाषा वापरा आणि हळु बोला... आणि लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट प्रेमाने सोडवली जाते...ही पद्धत वापरल्यामुळे तुमचे नातेसंबंध खराब होणार नाहीत...

मी स्वतः खूप सारे प्रॉब्लेम फक्त बोलुन solve केलेले आहेत...


3) राग आला तर जिथे आहात तेथून निघुन जा...

👉 मित्रांनो, जेंव्हा पण तुम्हाला राग येईल तेंव्हा त्या ठिकाणाहून निघुन जा... 

तुम्हाला ज्या व्यक्तीचा राग आला तुम्ही त्याच ठिकाणी उभे असाल तर... भांडण होऊ शकते..

कारण 

तुम्हाला ज्या व्यक्तीचा राग आलेला आहे तो व्यक्ती तुमचा समोरच असेल आणि त्याला पाहुन तुम्हाला अजुन राग येईल आणि भांडण होतील.... 

भांडण वैगरे होऊ नये यासाठी जेंव्हा पण तुम्हाला राग येईल तेंव्हा त्या जागेवरून निघुन जा... 

4)  रागामध्ये असाल तर गाणे एका

👉 मित्रांनो, तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल खुप खुप राग आला असेल आणि तुम्ही रागात असाल तर... आशा वेळेस गाणे ऐका 

तुमचे जे कोणते फेव्हरेट गाणं असेल ते गाणं लावा आणि त्या गाण्यासोबत जोरात गाणं बोला... असे केल्याने तुमचा राग 5 मिनिटात निघुन जाईल... 

मित्रांनो, मी माझं उदाहरणं सांगतो... 

मी जेंव्हा पण रागात असतो किंवा पुस्तक वाचुन बोर झालेलो असतो आशा वेळेस मी Marathi गाणे लावतो आणि गाणे ऐकतो... 

मी माझ्या आवडीचे गाणे ऐकतो आणि त्या गाण्यासोबत मी सुद्धा गाणं म्हणत असतो... या सर्व गोष्टीचा मला असा फायदा होतो कि, माझा मुड फ्रेश होतो आणि पुन्हा मी आनंदाने पुस्तक वाचत बसतो किंवा मला जे काम करायच असतं ते काम मी पूर्ण करतो... 👍

मित्रांनो, जेंव्हापण तुम्ही रागात असाल किंवा दुःखी असाल तेंव्हा ही टिप्स नक्की वापरा... 


5) Self Help Words चा उपयोग करा...

👉 मित्रांनो, या टिप्सचा उपयोग तुम्ही रागामध्ये सुद्धा करू शकता किंवा चालु जीवनात या टिप्सचा उपयोग करू शकता...

मित्रांनो जेंव्हा पण तुम्हाला खुप राग येईल किंवा तुम्ही रागात असाल तेंव्हा स्वतःला खालील वाक्य बोला... 

A) मी शांत व्यक्ती आहे... 

B) मी सर्वांनवर प्रेम करतो... 

C) मी सर्वांच्या चुका माफ करतो... 

D) मी एक सकरात्मक व्यक्ती आहे... 

E) मी एक आनंदी व्यक्ती आहे.. 

मित्रांनो, असे वाक्य तुम्ही स्वतः तयार करू शकता आणि जेंव्हा पण तुम्हाला राग येईल तेंव्हा एक ग्लास थंड पाणी प्या आणि हे वाक्य स्वतःशी बोला... असे केल्याने तुमचा राग काही क्षणातच निघुन जाईल... 👍

6) 1 ते 100 पर्यंत उजळणी म्हणा...

👉 ही पद्धत खुप जुनी आहे परंतु परिणामकारक पद्धत आहे... 

मित्रांनो, जेंव्हापण तुम्हाला राग येईल तेंव्हा कोणालाच काही शिवा वैगरे देऊ नका... 

आणि मनातल्या मनात 100 पर्यंत उजळणी म्हणा... 

असे केल्याने तुमचा राग खुप लवकर शांत होईल... 👍


7 ) शांत ठिकाणी जा आणि मनातला राग व्यक्त करा...

👉 मित्रांनो, जेंव्हा पण तुम्हाला खुप राग येईल तेंव्हा वरील टिप्स वापरा परंतु हे सुद्धा लक्षात ठेवा... अंगातला राग लवकरात लवकर बाहेर काढा... 

मित्रांनो, जेंव्हा तुम्ही एखाद्या व्यक्ती वर रागवता तेंव्हा तो राग तुमच्या पूर्ण शरीरात असतो... तुम्ही तो राग शरीरातून काढला नाही तर तुम्हालाच जास्त इजा  होईल.... त्यामुळे जेंव्हा पण तुम्हाला राग येईल तेंव्हा शांत रूम मध्ये जा आणि जोरात ओरडा किंवा रडा... 

जेंव्हा तुम्ही रडता किंवा ओरडता तेंव्हा काही वेळानंतर तुमचा पूर्ण राग शांत होतो आणि काही वेळानंतर तुम्ही समोरच्या व्यक्तीला माफ कराल...

मित्रांनो, वरील सर्व टिप्स वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा... 👍

आजचा लेख आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या... ❤

धन्यवाद... 🙏🌹

✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रेरणादायी बोधकथा:- आपण नेहमी योग्य असु शकत नाही...

अपयशी लोकांची कारणे