प्रेरणादायी बोधकथा:- आपण नेहमी योग्य असु शकत नाही...
You are not always right... मित्रांनो, पावसाचे दिवस सुरु होत असतात. एक चिमणी घरटं बांधण्यासाठी झाड शोधत असते... 🕊उडत असताना चिमणीला नदी काठी दोन झाडे दिसतात...🌳🌳 👉 चिमणी पहिल्या झाडाकडे जाते झाडाला विचारते, झाडा मी तुझ्या फांदीवर घरटे बांधून थोड्या दिवसाकरीता राहिले तर चालेल का? *पहिले झाड म्हणते अजिबात चालणार नाही ...* चिमणी दुःखी होऊन दुसऱ्या झाडाकडे जाते दुसऱ्या झाडाला विचारते, झाडा मी तुझ्या फांदीवर घरट बांधून राहिले तर चालेल का?? * दुसरं झाड लगेच चिमणीला परवानगी देते... * चिमणी खुश होते... झाडाच्या एका मजबूत फांदीवर छोटंसं सुंदर घरटं बांधते, घरट्यात अंडे देते, त्या अंड्यामधुन पिल्ले येतात... *चिमणी आणि तिचे लहानसे पिल्ले त्या घरट्यात राहु लागतात...* 👉 काही दिवसानंतर खूप जोराचा पाऊस पडतो... नदीला खतरनाक पूर येतो, त्या पूरामुळे नदीकाठी असलेले पहिले झाड खाली कोसळते आणि नदीच्या पाण्यासोबत वाहुन जाते... झाड वाहुन जात असताना चिमणी त्या झाडाला म्हणते... बघ तु मला तुझ्या फांदयावर राहायला दिले नाही ना म्हणून तुझी अशी अवस्था झाली आहे...