वाईट सवयी कशा सोडाव्या...??



वाईट सवयी कशा सोडाव्या...??

नमस्कार मित्रांनो कसे आहात, आशा करतो सर्वजण आनंदी, निरोगी आणि मजेत असाल...

मित्रांनो, जीवन बदलण्यासाठी आपण खुप साऱ्या गोष्टी करतो. जसे की, मोटिवेशनल लेख वाचतो, वेगवेगळे पुस्तके वाचतो, मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो... या सर्व गोष्टीमागचा उद्देश एवढाच असतो की, आपले जीवन बदलायला हवे... बरोबर ना 

मित्रांनो विचार करा... 

👉 तुम्ही YouTube वर निरोगी कसं राहावं याचा एक व्हिडीओ पाहत आहात....

व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला समजत की, रोज सकाळी 5 वाजता उठुन व्यायाम केल्याने आपण निरोगी राहू शकतो... तरी सुद्धा आपण सकाळी लवकर उठण्याची सवय लावत नाही...

आपल्याला नवीन सवयी लागत नाही... त्याच कारण म्हणजे *वाईट सवयी आपल्या आत लपलेल्या आहेत...*

आता असा प्रश्न पडतो की, वाईट सवयी कशा सोडाव्या...??

आजच्या काळात सर्वात वाईट सवय कोणती असेल तर, ती आहे... मोबाईल पाहत बसणे

आजचा तरुण दिवसाचे 5 तास मोबाईल पाहण्यात घालवतो... 

रोज 2 GB इंटरनेट डाटा मिळतो, डाटा संपवण्यातच पोरांचा संपूर्ण दिवस चालल्या जातो... 

आपण काय करतो हे आजकल मुलांना कळतं नाही... अभ्यासापेक्षा इंस्टाग्रामवर आपल्या फोटोला किती Like मिळतात यालाच तो महत्व देत आहे...

मित्रांनो, नवीन सवयी तेंव्हाच लागतील जेंव्हा तुम्ही तुमच्या जुन्या सवयी बदलाल...


उदाहणार्थ :- मोबाईल पाहण्याची सवय 

👉 तुम्ही अभ्यास करताना, पुस्तक वाचताना, किंवा मित्राशी नातेवाईकाशी बोलत असताना अधूनमधून मोबाईल पाहत असाल तर, समजुन जा तुम्हाला मोबाईल पाहण्याची वाईट सवय लागली आहे... 

ही सवय कशी सुटेल याबद्दल माहिती पाहुयात. 

मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? 

👉 आपला मेंदु खुप आळशी असतो, त्याला मेहनती कामापेक्षा आळसी काम खूप लवकर करावसे वाटते. 

जसे की, 

👉 एक तास खेळायला जाणे  किंवा एक तास पुस्तक वाचणे, 

👉 सकाळी लवकर उठुन व्यायाम करायला जाणे किंवा सकाळी एक तास शिल्लक झोप घेणे 

हाच प्रश्न तुम्हाला विचारला तर, तुम्ही कोणते काम करायचं निवडाल...

101% ... आळसी काम तुम्ही लवकर निवडाल...

मित्रांनो, आपल्या मेंदूला कष्ट करायला अजिबात आवडत नाही... तो नेहमी काही ना काही शॉर्टकट मार्ग शोधत असतो... 

*जे लोकं आळसी असतात ते खुप हुशार असतात... जगात जेवढे पण शोध लागले ते फक्त आळसी माणसामुळे लागले आहेत...*😄

*मोबाईल पाहण्याची वाईट सवय कशी सुटेल ते पाहुयात...*

मित्रांनो, तुम्ही विद्यार्थी असाल तर, अभ्यासाला बसण्याआधी तुमचा मोबाईल बंद करा... 

आणि तो मोबाईल एका डब्ब्यात टाका आणि तो डब्बा आलमारीमध्ये बंद करा..आलमारी लॉक करा आणि त्याची चाबी... आई जवळ देऊन टाका... 😄

असं करण्याचा फायदा असा होईल की, जेंव्हा पण तुम्हाला मोबाईल पाहण्याचं मन होईल तेंव्हा तुम्हाला मेहनत करावी लागेल...

जसे की, 

👉 सर्वात आधी तुम्हाला आईकडे जावं लागेल, आईकडुन आलमारीची चाबी घ्यावी लागेल नंतर आलमारी उघडावी लागेल नंतर डब्बा उघडावा लागेल आणि नंत्तर मोबाईल चालु करावा लागेल... नंतर इंटरनेट डाटा सुरु करावा लागेल नंतर व्हाट्सअप, इंस्टाग्राम msg पाहावे लागतील...😄

मित्रांनो, हिच प्रोसेस जर तुम्हाला दिवसामधुन दोन चार वेळा करायची काम पडली तर, काय होईल माहिती आहे का??

तुम्हाला मोबाईल पाहण्याचा 101% कंटाळा येईल... 😄

तुम्ही स्वतःला सांगाल की, आधी पूर्ण अभ्यास करू नंत्तर मोबाईलचे msg पाहत बसु.... 

याप्रमाणे तुम्ही मोबाईल पाहण्याची वाईट सवय सहज सोडु शकता...👍

मित्रांनो, तुम्हाला जी पण वाईट सवय सोडायची असेल त्या सवयीला अवघड स्वरूपात कन्व्हर्ट करा...तुमची वाईट सवय नक्की सुटून जाईल...

मित्रांनो, आजचा लेख आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या... आणि लेखात सांगितल्याप्रमाणे घरी सराव करा... ❤

धन्यवाद...🙏🌹

✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रागावर नियंत्रण कसे ठेवावे..??

प्रेरणादायी बोधकथा:- आपण नेहमी योग्य असु शकत नाही...

अपयशी लोकांची कारणे