प्रेरणादायी बोधकथा...


मित्रांनो, एका गावात एक साधु महाराज राहत होते...साधु महाराज खूप हुशार खूप ज्ञानी होते... महाराज नेहमी अंगावर चादर आणि डोक्यावर टोपी घालायचे...

👉 गावातील लोकं बिमार पडल्यावर किंवा त्यांना एखादी समस्या आल्यावर ते नेहमी साधु महाराजाकडे जायाचे...

साधु महाराज बिमार व्यक्तीच्या अंगावर चादर फिरवायचे त्याला औषधं पाणी द्यायचे आणि लोकांना निरोगी करायचे... लोकांना त्यांच्या समस्याचे समाधान सांगायचे...

👉 मित्रांनो, गावातील लोकांचा त्या साधु महाराजांवर एवढा विश्वास होता की साधु महाराजांनी त्यांच्या अंगावरची चादर एखाद्या बिमार व्यक्तीच्या अंगावरून फिरवली तरी, तो बिमार व्यक्ती ऑटोमॅटिक चांगला व्हायचा...

असेच काही दिवस जातात...

गावात एक व्यक्ती असतो,  त्याचं नाव कैलास असते...

👉 कैलास साधु महाराजाच्या प्रसिद्धीवर खूप जळत असतो.... त्याला वाटतं साधु महाराजाजवळ जी चादर आहे ती नक्की जादूची चादर असेल....

आपण जर साधु महाराजाच्या अंगावरची चादर चोरून आपण घातली तर लोकं आपल्याला साधु महाराजांसारखं समजतील...

आपल्याला खूप मान, सन्मान देतील.... असा विचार करुन कैलास साधु महाराजाच्या अंगावरची चादर चोरण्याचा प्रयत्न करतो....

साधु महाराज अंगोळ करायला गेले असता...कैलास चादर चोरण्याचा प्रयत्न करतो परंतु तो अपयशी होतो...

असंच एके दिवसी कैलास त्या साधु महाराजांला आपल्या घरी बोलवते आणि समस्या सांगते...

कैलास साधु महाराजांना म्हणतो महाराज तुम्ही प्रत्येकाचे प्रॉब्लेम Solve करता...

आज माझा प्रॉब्लेम solve करा... *तुमच्या अंगावरची चादर मला द्या...🙏🏻

साधु महाराज कसला ही विचार न करता लगेच अंगावरची चादर काढतात आणि कैलासला देऊन टाकतात...

कैलास लगेच ती चादर घेते  अंगावर गुंडाळते....

चादर अंगावर घालुन कैलास गावभर फिरतो... त्याला वाटतं मी साधु महाराजांच्या अंगावरची चादर घातल्यामुळे लोकं मला मान देतील, मला सन्मान देतील...

आता लोकं माझ्याकडे तक्रार घेऊन येतील आणि मी त्यांची तक्रार दोन मिनिटात solve करेल... असा विचार कैलास करत असतो...

परंतु

त्याच्या मनासारखं असं काहीच घडतं नाही...

कैलास अंगावर चादर घेऊन फिरत असताना लोकं त्याला पाहतात आणि त्याला मूर्ख समजतात....

काही लोकं म्हणतात अरे मुर्खा उन्हाळाचे दिवस सुरु आहे आणि तु अंगावर चादर घेऊन हिंडतो...😄

गावाबाहेर कैलासला एक भिकारी दिसतो... कैलास त्या भिकऱ्याला  म्हणतो... सांग तुला कोणकोणते पदार्थ खायाचे आहेत...

तुझ्या सर्व इच्छा आज मी पूर्ण करेल

तो भिकारी व्यक्ती म्हणतो... भाऊ तुम्ही कोण आहात... तुम्ही

 जादूगार आहात का...??😄

कैलास म्हणतो, नाही नाही ... माझ्याकडे जी चादर आहे ना ती खूप शक्तीशाली चादर आहे...चादरमध्ये शक्ती आहे...

कैलास जमिनीवर चादर पसरवतो आणि जेवायला छान छान पदार्थ मागतो... एक तास होऊन जातो तरी सुद्धा चादर काहीच खायला देत नाही...हे पाहुन तो भिकारी कैलासवर चांगलाच चिडतो...

शेवटी कैलास लोकांच्या शिव्या ऐकून, लोकांचे बोलणे ऐकून शेवटी साधु महाराजांकडे परत जातो... आणि  साधु महाराजांना म्हणतो, महाराज मला माफ करा... तुमची चादर तुम्हालाच ठेवा...🙏🏻 

शेवटी साधु महाराज कैलासला म्हणतात, कैलास तु फक्त माझी चादर घेऊन गेला होता...

माझ्यामधलं ज्ञान, विश्वास, भक्ती ह्या गोष्टी तु माझ्याकडून नेऊ शकला नाही.... मग तु तुझ्या कामात कसा यशस्वी होऊ शकतो...🤷‍♂️

👉 मित्रांनो, या सुंदर गोष्टीचे तात्पर्य असे आहे की, तुम्ही जसे आहात त्याचा स्वीकार करा... दुसऱ्यासारखं बनायचा अजिबात प्रयत्न करू नका...

मित्रांनो, आजकल खूप लोकं इतर लेखकाचे लेख चोरतात आणि त्या लेखाखाली स्वतःचे नाव लिहितात...

अशी चोरी करुन तुम्ही त्या ओरिजिनल लेखकांसारखं अजिबात बनु शकणार नाही...त्यामुळे तुम्ही जसे आहात त्याचा स्वीकार करा... आणि स्वतःला घडवा...

👉 तुम्ही जर दुसऱ्याची कॉपी कराल तर एक दिवस तुम्हीच तोंडावर पडाल...लोकांसमोर स्वतःच हसु करुन घेऊ नका...

मित्रांनो, मला सांगा

एखाद्या कुत्र्याने जर स्वतःच्या अंगावर वाघाचे कातडे लावले तर तो कुत्रा वाघ बनु शकेल का...??

अजिबात बनु शकत नाही... बरोबर ना

तुम्ही अमिताभ बच्चन सरचा कोट घालून अमिताभ बच्चन बनु शकत नाही...

मित्रांनो, तुम्ही एखाद्या व्यक्तीची नक्कल करू शकता परंतु नक्कल करुन तुम्ही रिअल लाईफमध्ये जास्त दिवस टिकू शकणार नाही... त्यामुळे तुम्ही जे पण काम कराल ते स्वतःहून करा... दुसऱ्याची नक्कल करू नका...

👉 एखादा व्यक्ती तुमची कॉपी करत असेल किंवा तुमचे लेख कॉपी करुन स्वतःचे नाव लिहित असेल तर आशा व्यक्तीला काहीच बोलु नका... आशा मूर्ख व्यक्तीला वेळ उत्तर देत असतो..

मित्रांनो, आजची प्रेरणादायी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की फीडबॅक द्या...

धन्यवाद... 🙏🏻🌹

✍️✍️ नरेंद्र दिपके

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रागावर नियंत्रण कसे ठेवावे..??

प्रेरणादायी बोधकथा:- आपण नेहमी योग्य असु शकत नाही...

अपयशी लोकांची कारणे