मोफत सल्ल्याचे महत्त्व....
Importance of free Advice (मोफत सल्ल्याचे महत्त्व )
मित्रांनो, आपल्या जीवनात असे काही लोकं असतात जे आपल्याला नेहमी फुकट सल्ले देत राहतात...त्यांच्या सल्ल्याना आपण काही महत्व देत नाही...आपण त्यांच्या फुकट सल्ल्याना इग्नोर करत असतो...
कधी कधी तर फुकट सल्ला देणाऱ्याला आपण उलटसुलट सुद्धा बोलतो...
जसे की,
*तुझ्या Free Advice ची मला गरज नाही...*❌
मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का?? *फुकट सल्ले देणारे/सांगणारे लोकं नेहमी आपल्यालाच का सल्ले देत राहतात...*
मित्रांनो, यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे... फुकट सल्ले सांगणाऱ्या लोकांना तुमची खरोखर काळजी असते... असे लोकं तुम्हाला Follow करतात Like करतात... म्हणूनच ते लोकं त्यांच्या वयानुसार तुम्हाला फुकट परंतु चांगले सल्ले देत राहतात...
मित्रांनो, तुम्हाला जर कोणी फुकट सल्ले देत असेल तर तुम्ही स्वतःला नशीबवाण समजु शकता... कारण फुकट सल्ले देणारे लोकं नेहमी तुमचं निरीक्षण करत राहतात...तुमच्यावर लक्ष ठेवुन राहतात...जेंव्हा तुम्ही कुठे तरी चुकतं असता तेंव्हा हे लोकं Free Advice देतात.
आपल्या मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, *ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे*
तुम्हाला कोणी सल्ला देत असेल किंवा तुम्ही कोणाकडून सल्ला घ्यायला गेले असाल तर आशा वेळी लोकांनी दिलेल्या Advice वर विचार करा आणि नंतर ऍकशन करा...
👉 समजा, तुमच्या माईंडमध्ये एखादा नवीन बिजनेसचा मायक्रो प्लॅन आहे... तुम्ही मित्राकडून बिजनेसच्या संदर्भात सल्ला घ्यायला गेले असता, मित्र तुम्हाला त्याच्या अनुभववरून तुम्हाला सल्ला देईल...
जसे की
नवीन बिजनेस टाकु नको, बिजनेस मोठा व्हायला खूप पैसे लागतात... तुझा बिजनेस चालणार नाही...वेळ आणि पैसे वाया जातील...
मित्रांनो, आशा वेळी शांत राहून निर्णय घ्या... तुम्हाला तुमच्या स्वतःवर आणि बिजनेस प्लॅनवर विश्वास असेल तर नक्की नवीन बिजनेस सुरु करा...👍
समोरचा व्यक्ती चांगला सल्ला देत आहे की वाईट याची समज स्वतःला व्हायला हवी...
मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा....
जेंव्हा पण एखादा सामान्य व्यक्ती तुम्हाला सल्ला देईल... तेंव्हा त्या व्यक्तीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका... त्या व्यक्तीने सांगितलेल्या सल्लाबद्दल थोडा विचार करा...
कधी कधी एखाद्या व्यक्तीचा सल्ला आपलं जीवन बदलू शकते... किंवा त्याच्या सल्लामुळे आपल्या डोक्यात एखादी नवीन आयडिया येऊ शकते...
👉 मित्रानो, जेंव्हा पण एखादा व्यक्ती तुम्हाला काही सल्ला देत असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला सांगत असेल आशा वेळी समोरच्या व्यक्तीकडे लक्ष द्या... त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्या...त्या व्यक्तीला मध्येमध्येच डिस्टरब करू नका...सारखं डिस्टरब केल्याने समोरचा व्यक्ती तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार नाही...
जेंव्हा पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपल्या लहान भावाला, लहान मित्राला एखाद्या विषयासंदर्भात सल्ला द्याल तेंव्हा चांगलाचं सल्ला द्या... वाईट सल्ला देऊ नका...
मोफत सल्लाचं तुम्हाला एक उत्तम उदाहरणं सांगतो.. म्हणजे तुमच्या लक्षात येईल...मोफत सल्ला आपल्या फायदासाठी असतो...
मित्रांनो, वर्ष 2001 मधली गोष्ट आहे, सचिन तेंडुलकर सर हे एका मॅचच्या दरम्यान चेन्नईच्या ताज हॉटेलमध्ये थांबले होते...
सचिन सरांनी कॉपीची ऑर्डर केली होती आणि थोड्या वेळात एक वेटर कॉपी घेऊन सचिन सरांकडे जातो...कॉपी दिल्या नंतर वेटर सचिन सरांना म्हणतो... सर मला क्रिकेटविषयी तुमच्याशी बोलायचं आहे... तर प्लीज बोलु का??
सचिन सर, होकार देतात... बोला
तेंव्हा तो वेटर सचिन सरांना एक सल्ला देतो तो म्हणतो...
सर जेव्हा तुम्ही लेफ्ट आर्म गार्ड घालता तेव्हा तुमच्या बॅटीच्या रिफ्लेक्शनमध्ये खूप बदल जाणवतो...
sweep shot, Pull Shot मारताना जेवढी ताकद पाहिजे तेवढी ताकद त्या आर्म गार्ड मुळे तुम्हाला मिळतं नाही, शॉट मारताना बॅट सुद्धा स्विंग करते....त्यामुळे तुम्ही नेहमी कॅच आऊट होतं आहात...
पुढे तो वेटर म्हणतो सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि तुमची बॅटिंग मी पुन्हा पुन्हा पाहतो. तेव्हा मला हे समजलं
सचिन सरांनी, त्या वेटरच संपूर्ण ऐकलं आणि रात्री प्रक्टिससाठी नेटमध्ये गेल्यावर त्यांना त्या वेटरने सांगितलेली गोष्ट आठवली...त्यांनी लेफ्ट आर्म गार्ड घातलं आणि प्रॅक्टिस केली तेंव्हा त्यांना पण समजलं की खरंच या आर्म गार्डची साईझ खूप मोठी आहे... नंतर सचिन सरांनी त्यांच्या लेफ्ट आर्म गार्डची साईझ कमी करतात....
सचिन सरांनी त्या वेटरचा उल्लेख त्याच्या Biography मध्ये पण केलेला आहे... *गुरुप्रसाद हे त्या वेटरचं नाव आहे...* Biography मध्ये सचिन सर लिहितात की त्या वेटरमुळे माझ्या बॅटिंगमध्ये खूप सुधार झाली...❤
झालं असं की, वर्ष 2001 व त्या आधीचे काही वर्ष सचिन तेंडुलकर सर हे क्रिकेट खेळताना, स्वीप शॉट पूल शॉट मारताना कॅच आऊट व्हायचे...मोठी पारी खेळु शकत नव्हते आणि हिच गोष्ट गुरुप्रसाद ने निरीक्षण केली होती...
👉 मित्रांनो, या छोट्याश्या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की जे लोकं आपल्याला फुकट सल्ले देतात ते आपलं निरीक्षण करत असतात...त्यामुळे जेंव्हा पण एखादा व्यक्ती तुम्हाला फुकट सल्ला देईल तेंव्हा त्या माणसाचा सल्ला शांतपणे ऐका आणि त्या सल्लाबद्दल थोडा विचार करा...निगेटिव्ह अटीट्युड बाळगू नका...
विचार करा, ज्या व्यक्तीला क्रिकेटचा देव म्हणलं जाते आशा व्यक्तीला दुसऱ्याच्या सल्लाची काय गरज... तरी सुद्धा सचिन सरांनी त्या सामान्य वेटरचा सल्ला शांतपणे ऐकला आणि त्यावर विचार केला...
मित्रांनो, तुमच्या जीवनात तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला तर, नेहमी चांगल्या मित्राचा सल्ला नेहमी घ्या... सल्ला मागायला लाजू नका...
तुम्हाला कोलगेट कंपनीची गोष्ट माहिती असेलच... प्रॉडक्ट सेलिंग करण्यासाठी त्यांनी प्रत्येक व्यक्तीकडुन सल्ला घेतला होता...आणि त्यांना त्यांच्या प्रॉब्लेमचं सोलुशन सुद्धा मिळालं होतं...
👉 मित्रांनो, आजपासून प्रत्येक व्यक्तीची रिस्पेक्ट करा प्रत्येक व्यक्तीच मत ऐका आणि त्यावर विचार करून पाहा... एखाद्या व्यक्तीचा सल्ला तुम्हाला आवडला असेल किंवा त्या व्यक्तीच्या सल्लामुळे तुमच्या जीवनात काही बदल झाला असेल तर आशा वेळी त्या व्यक्तीला धन्यवाद म्हणायला अजिबात विसरू नका... 👍
मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या...
धन्यवाद...🙏🏻🌹😇
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697

.jpg)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thank You... 🙏🏻🌹