Busy With Yourself...

Busy With Yourself...


👉 मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीने BWY Day साठी महिन्यातून एक दिवस वेगळा काढायलाच हवा... 

 प्रत्येक दिवसी आपण आपले रोजचे काम करतच असतो... 

जसे कि, 

👉 तुम्ही जर जॉब करत असाल तर रोज ऑफिस मध्ये जाव लागते,...  शिक्षक असाल तर शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवावं लागते... तुमचा एखादा बिजनेस असेल तर रोज मिटिंगा घेणे, रोज कॉल घेणे, ई-मेल चेक करणे,  नवीन लोकांना भेटणे.  

तुम्ही विद्यार्थी असाल तर रोजच्या To Do List नुसार तुम्हाला अभ्यास करावा लागतो... 

थोडक्यात काय तर प्रत्येक जॉब करणाऱ्या व्यक्तीला महिन्याच्या 30 दिवस ही सारखेच काम करावे लागते...

एक गोष्ट लक्षात घ्या.. 

एक मशीन दिवसाचे 24 तास लगातार काम करू शकते परंतु माणुस त्या मशीन सारखे  दिवस भर किंवा महिना भर एकसारखे काम करू शकत नाही... 

👉 तुम्ही जर एकच काम सारखे सारखे करत असाल तर काही दिवसानंतर तुम्हाला कंटाळा येईल म्हणजे येईलच...

  आपल्याला कधी कधी काम करण्याचा कंटाळा येतो कारण आपण माणुस आहोत... सतत काम केल्यामुळे आपले पूर्ण शरीर  थकते...  सोबतच दिमाग सुद्धा थकून जात असतो...

तुम्हाला माहिती आहे का? 

👉 खुप सारे क्रिकेटर क्रिकेट मधुन थोड्या दिवसासाठी ब्रेक घेतात... बाहेर कुठे तरी फिरायला जातात आणि परत क्रिकेट खेळायला सुरुवात करतात.  क्रिकेटमधुन ब्रेक घेण्याचे कारण हेच असते कि,  ते क्रिकेट खेळून खेळून थकलेले असतात... 

मित्रांनो, तुम्ही एकच काम करून परेशान झाले असाल किंवा काम करताना तुम्हाला चिडचिड होत असेल तर तुम्ही BWY Day साजरा करायला पाहिजे.  

👉 प्रत्येक व्यक्तीला रविवारची सुट्टी मिळत असते... आणि एका महिन्यात 4 किंवा 5 रविवार येतात...  

 तुम्ही त्या 4 रविवार मधुन कोणताही एक रविवार BWY Day साठी निवडा... आणि तो पूर्ण एक रविवार,  एक दिवस स्वतःसाठी द्या... आणि रोजच्या वातावरणापासुन, कामापासून स्वतःला दुर करा...

👉 एक दिवस मन मोकळे फिरा,  निसर्गाचा आनंद घ्या... तुम्ही जॉब करता, किंवा तुम्ही शिक्षक आहात, विद्यार्थी आहात, हे सर्व एका दिवसासाठी विसरून जा... 😄 

एक दिवस लहान मुलांन सारखे जीवन जगा... हसा, मजाक करा आणि आनंदी रहा. 

तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करा...  तुमच्या आवडीचा एखादा चित्रपट असेल तर तो चित्रपट पहा... तुमच्या आवडीचे जेवण करा...

तुमच्या घरी Dog, Cat असेल तर त्याच्या सोबत बोला, त्याच्या सोबत खेळा.... 

किंवा 

तुमच्या आवडीचे एखादे पुस्तक वाचा... गार्डनमध्ये जाऊन थोडा वेळ बसा, निसर्ग कसा दिसतो ते पाहा, मेडिटेशन करा... 🧘‍♂️


( व्यवसाय किंवा घरातील कोणत्याही समस्येचा विचार न करता केवळ स्वतःच्या आवडीचे काम करणे यालाच BWY Day म्हणजे Busy With Yourself Day म्हणतात... )

थोडक्यात, ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी करा...

👉 मित्रांनो, जेंव्हा आपण पूर्ण दिवस स्वतःला देतो, स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करतो, स्वतःला रिफ्रेश करतो, ह्या साऱ्या गोष्टी केल्यामुळे  स्वतःला एक सकरात्मक ऊर्जा मिळते आणि या सकरात्मक ऊर्जेचा उपयोग तुम्ही महिण्याच्या 30 ही दिवस करू शकता...

सकरात्मक ऊर्जा तुम्हाला पुढील 30 दिवस सकरात्मक राहण्यासाठी, तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी तुमची मदत करेल. 

👉 मित्रांनो, प्रत्येक बिजनेस मॅन, प्रत्येक यशस्वी झालेले लोक सुद्धा BWY Day साजरा करतात... तुम्ही सुद्धा BWY Day साजरा करा...

तुम्हाला 100%चांगला परिणाम मिळेल...

 धन्यवाद 🙏 

✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रागावर नियंत्रण कसे ठेवावे..??

प्रेरणादायी बोधकथा:- आपण नेहमी योग्य असु शकत नाही...

अपयशी लोकांची कारणे